प्रेषित मुहम्मद (स) - अरबांचाच नव्हे तर अखिल मानवजातीचा ‘तारणहार’!
जनाब सय्यद इफ्तिखारसाहेब यांचे आम्ही पुनश्च अभिनंदन करतो ते एवढ्यासाठी की त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण, संशोधनपूर्ण असे मुहम्मद पैगंबरसाहेब यांचे चरित्र मराठीत आणले आहे. त्यासाठी त्यांनी ५० हून अधिक साधनग्रंथांचा आधार घेतला आहे. त्यांच्या प्रतिपादनात कुठेही अभिनिवेश नाही. अत्यंत सोप्या शैलीत रसाळ भाषेत त्यांनी पैगंबरसाहेबांचे हे चरित्र लिहून केवळ इस्लामचीच नव्हे तर मराठी भाषेचीही सेवा केली आहे.......